Friday, January 2, 2015


कवितेतून घडलेला विनोदी  संवाद :
पात्र - क्षमा  , भूभाक्षी  आणि  माणिक  ( पाहुनी कलाकार) :P :P
क्षमा  :

नका पाहू PC कडे डोळे वटारून
चल खाऊ मिसळ पाव ताणून
नका आपटू keyboard खटखट
चल खाऊन येऊ वडापाव फटफट

माणिक  : वाह - वाह

 क्षमा  :  तूच बघ माणिक खरी जाणकार नाहीतर... हा बघ दगड नुसता

भूभाक्षी  :
दगड दगड म्हणून घातलेत माझ्यावर घाव हजार
देवपण सिद्ध झाले कि तुम्हालाही फुटेल पाझर

क्षमा  :
आम्ही नाही मानत देव
देव हि संकल्पनाच मुळी भुरटी

भूभाक्षी  :
म्हणे देव हि संकल्पनाच मुली भुरटी ,
पण देवाकडे मागून मागून दमलीय हि कार्टी
( क्षणभर वैचारिक विश्रांती …. )
भूभाक्षी  :
आता गप्प होऊन कुठला गीरावाताय धडा ,
कुठे गेला तुमचा मिसळ पाव नि वडा

क्षमा  :
 कार्टी कार्टी म्हणतो कुणाला
एकदा विचार स्वतःच्या मनाला,
लाभलाय का कधी हा देव तुला,
लाभलाय का कधी हा देव मला ,
म्हणूनच म्हणते,
देव हि संकल्पनाच मुळी भुरटी 

भूभाक्षी 
(देवाला ) मागणाऱ्याला नसते कुठलेच भान,
कितीही दिले तरी भागात नसते तहान,
मागण्यापेक्षा देणे असते महान,
समजणार कसे आपण असतो लहान